ऑनलाईन टीम / मेक्सिको सिटी :
मेक्सिको आणि मेक्सिकोच्या काही भागात मंगळवारी सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 7.4 रिश्टर स्केल एवढी होती. या भूकंपानंतर मेक्सिको, दक्षिणी मेक्सिको, ग्वाटेमाला, अल साल्वाडोर आणि होंडुरासमध्ये त्सुनामी येऊ शकते, असे अमेरिकेच्या त्सुनामी मॉनिटरिंग सिस्टमने म्हटले आहे.

मंगळवारी सकाळी 10.29 वाजता झालेल्या या भूकंपाचे केंद्रबिंदू क्रुसेटाच्या दक्षिणेस 23 कि.मी. आणि ओएक्सका राज्यातील एका गाव होते. भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. भूकंपामुळे मेक्सिको सिटीतील दोन इमारतींचे किरकोळ नुकसान झाले आहे. तर या भूकंपातून दोन लोकांचा मृत्यू झाल्याचे ओएक्सकाचे राज्यपाल अलेजान्ड्रो मुरत यांनी सांगितले.








