ऑनलाईन टीम / मेक्सिको सिटी :
मेक्सिकोत कोरोनाबाधितांच्या संख्येने 10 लाखांचा टप्पा गाठला आहे. तिथे आतापर्यंत 10 लाख 03 हजार 253 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 98 हजार 259 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
मेक्सिकोत शनिवारी 5558 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 568 जणांचा मृत्यू झाला. 10.03 लाख रुग्णांपैकी 7 लाख 45 हजार 361 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 1 लाख 59 हजार 633 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 2941 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत मेक्सिकोचा जगात अकरावा क्रमांक लागतो. तर कोरोनाबळींच्या संख्येत चौथा क्रमांक लागतो. मेक्सिकोत आतापर्यंत 26 लाख 04 हजार 659 नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.









