ऑनलाईन टीम / मेक्सिको सिटी :
मेक्सिकोत आतापर्यंत 7 लाख 38 हजार 163 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 77 हजार 163 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
मेक्सिकोत मंगळवारी 3400 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 173 जणांचा मृत्यू झाला. 7.38 लाख रुग्णांपैकी 5 लाख 30 हजार 945 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 1 लाख 30 हजार 055 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 2592 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत मेक्सिकोचा जगात आठवा क्रमांक लागतो. तर कोरोनाबळींच्या संख्येत चौथा क्रमांक लागतो. मेक्सिकोत आतापर्यंत 19 लाख 35 हजार 334 नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.









