बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मंगळवारी सांगितले की सरकार निःसंशयपणे कावेरी नदी ओलांडून मेकेदातू प्रकल्प राबवेल. ते म्हणाले, “कोणत्याही कारणास्तव हा प्रकल्प थांबवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राज्यातील जनतेला याबद्दल शंका नसावी,” असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री येडियुरप्पायांनी असा दावा केला की कर्नाटकला या संदर्भात गोष्टी “अनुकूल” आहेत आणि प्रकल्प “कायदेशीर चौकटीत” पूर्ण होईल. बेंगळूर येथे पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना येडीयुरप्पा म्हणाले, कोणीही हे थांबवू शकत नाही. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प पूर्ण होणार असे ते म्हणाले. दरम्यान, कर्नाटक सरकारने कावेरी नदीवर मेकेदातू प्रकल्प उभारणार असल्याची घोषणा केल्यानंतर याचे पडसात तामिळनाडूत उमटण्यास सुरुवात झाले.
कर्नाटक सरकारने हा निर्णय मनमानी पद्धतीने घेतला आहे अशी टीका अद्रमुक पक्षाने केली आहे. दरम्यान कावेरी नदीच्या पाण्यावरील हक्क तामिळनाडू सरकारने सोडता कामा नये असा आग्रह त्यांनी धरला आहे. परंतु कर्नाटक सरकारने केंद्र सरकारकडून आपल्याला अनुमती मिळाल्याने आम्ही हा प्रकल्प सुरू करीत असल्याची घोषणा मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी याआधी केली आहे.
दरम्यान पाणी वाटपाच्या संबंधातील याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्याने कर्नाटकने असा एकतर्फी निर्णय घेणे आक्षेपार्ह आहे असे तामिळनाडूचे विरोधी पक्ष नेते के. पलानीस्वामी यांनी म्हंटले आहे. परंतु कर्नाटक सरकारने कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प उभारणार असल्याचे म्हंटले आहे.