बेंगळूर/प्रतिनिधी
मेकेदातू प्रकल्पावरून कर्नाटक आणि तामिळनाडू यांच्यात वाद आहे. कावेरी नदीवर होणाऱ्या या प्रकल्पाला तामिळनाडूचा विरोध आहे. दरम्यन, केंद्रीय जलमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी मंगळवारी बेंगळूर येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची भेट घेतली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मेकेदातू आणि अन्य प्रकल्पांना सहकार्य करण्याची विनंती केली होती. यावेळी शेखावत यांनी याला सकारत्मक प्रतिसाद दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. आता कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डॉ. सी.एन. अश्वथ नारायण यांनी मेकेदातू प्रकल्प काळाची गरज असल्याचे म्हंटले आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री डॉ. सी.एन. अश्वथ नारायण यांनी पाण्याचे वाटप झाले आहे, याचा तामिळनाडूवर परिणाम होणार नाही. आपण एकमेकांची काळजी घेणे आणि लोकांना पिण्याचे पाणी मिळणे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. हा प्रकल्प होणे काळाची गरज आहे, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरही लक्ष दिले जाईल असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी मंगळवारी मेकेदातू प्रकल्पाविषयी बोलताना राज्य सरकार कोणत्याही परिस्थितीत मेकेदातू प्रकल्प शंभर टक्के पूर्ण करेल असे म्हंटले आहे.