अतिरेक कशाचाही असला तरी तो वाईटच असतो. आता मेक अप उत्पादनांचंच बघा. मेक अप केल्यानंतर सौंदर्यात अधिकच भर पडते. मात्र या उत्पादनांचा अतिरेक घातक ठरू शकतो.
- प्रायमरच्या नियमित वापरामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. बहुसंख्य प्रायमर्स वॉटर बेस्ड असतात. तसंच त्यात सिलिकॉनचं प्रमाणही जास्त असतं. प्रायमरच्या नियमित वापरामुळे चेहर्यावरही खुली रोमछिद्रं बंद होऊ शकतात. तसंच प्रायमर अधिक काळपर्यंत लावून ठेवू नये. घरी आल्यानंतर मेक अप रिमूव्हरने काढून टाकावा.
- सध्या बर्याच जणी लिक्विड मॅटे लिपस्टिकचा वापर करतात. ही लिपस्टिक सुंदर दिसत असली तरी यामुळे ओठ कोरडे पडतात. अशा लिपस्टिक्समुळे ओठांना ओलावा मिळत नाही. त्यामुळे मॅटे लिक्विड लिपस्टिकचा सततचा वापर त्रासदायक ठरू शकतो. त्यातच मॅटे लिपस्टिकचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी ओठांना नियमितपणे मॉईश्चरायझर लावा.
- नखांचं सौंदर्य खुलवण्यात नेल पॉलिशचा महत्त्वाचा वाटा असतो. यासोबतच महिला नेल स्टेंथनरचाही वापर करतात. मात्र याच्या अतिवापरामुळे नखं तुटू शकतात. तसंच नखांचा पोतही बदलू लागतो.
- फुटलेल्या ओठांवर तसंच त्वचेवर पेट्रोलियम जेली लावली जाते. बर्याच जणी पेट्रोलियम जेलीने मेक अपही काढतात. मात्र या जेलीच्या अतिवापरामुळे त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात. पेट्रोलियम जेलीमुळे त्वचेचा ओलावा कमी होऊ लागतो. त्वचा निस्तेज आणि कोरडी दिसू लागते. त्यामुळे या जेलीचा अतिवापर टाळावा.









