प्रतिनिधी/वाकरे
कोरोना विषाणूच्या संकटामुळे मेंढपाळ व्यवसाय अडचणीत आला आहे. सध्या पावसाळा तोंडावर आला असून शासनाने मेंढपाळांना स्थलांतर करण्यासाठी जिल्हाबंदी आदेशातून वगळावे व कोल्हापूर, सांगली, सोलापूर येथे मेंढपाळांना जाण्यासाठी लवकरात लवकर पास उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय वाघमोडे यांनी केली.
खुपिरे (ता.करवीर) येथे आयोजित केलेल्या बकरी लसीकरण कार्यक्रमात वाघमोडे बोलत होते.यावेळी वाघमोडे व पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.वाय.ए.पठाण यांच्या हस्ते लसीकरण शुभारंभ करण्यात आला.
वाघमोडे यांनी सध्या बकऱ्यांना चारा नाही, त्यामुळे मेंढपाळ आर्थिक अडचणीत सापडल्याचे सांगितले. पावसाळा तोंडावर आला असून मेंढपाळांना आता पाच महिने बाहेरच्या जिल्ह्यात जावे लागते हे स्थलांतर करण्यासाठी शासनाने लवकरात लवकर पास उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी त्यांनी केली. मेंढपाळांना स्थलांतर करताना बकऱ्यांना लसीकरण करून घेणे व सॅनीटायझर व मास्क वापरावे अशा सूचना केल्या.
पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय.ए.पठाण म्हणाले की जिल्ह्यातील सुमारे १७०० मेंढपाळ व सुमारे २ लाख ६२ हजार बकरी स्थलांतरित होतात. मेंढपाळांनी बकऱ्यांना मान्सूनपूर्व घटसर्प ,फऱ्या,आंतरविषार लसीकरण करून घ्यावे. यासाठी जिल्ह्यात १७३ पशुसंवर्धन कर्मचारी कार्यरत आहेत. मेंढपाळांना स्थलांतर करण्यासाठी नोंदणी चालू असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विनोद पवार, राम कोळेकर, डॉ.लक्ष्मण करपे, नामदेव पिंगळे, डॉ. राजू साकळकर, डॉ.प्रकाश गायकवाड, ड्रेसर सी.आर.पाटील ,परिचर महेश शिंदे, रघुनाथ शिरगावकर, मेंढपाळ भगवान हराळे, संजय हराळे, मारुती हराळे ,भिकाजी हराळे, शिवाजी हराळे ,अक्षय हराळे,सौरभ हराळे उपस्थित होते.
Previous Articleचंद्रदर्शन झाल्यानंतरच रमजान ईद
Next Article प्रधानमंत्री आवास योजनेची गती आणि अनुदानाचा लाभ








