बेंगळूर : गुलबर्गा येथे मॅनहोलमध्ये स्वच्छतेसाठी उतरलेल्या दोन सफाई कर्मचाऱयांचा मृत्यू झाला होता. तर एक जण अत्यवस्थ झाला होता. या प्रकरणाची उच्च न्यायालयाने गंभीरपणे दखल घेतली असून मॅनहोलमध्ये कर्मचाऱयांना उतरविल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य सरकारला दिला आहे. गुलबर्गा येथे मॅनहोलमध्ये स्वच्छतेसाठी उतरलेल्या दोन कर्मचाऱयांचा गुदमरुन मृत्यू झाला होता. या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. बुधवारी या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने यापुढे अशा घटना घडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. मॅनहोल स्वच्छतेसाठी कर्मचाऱयांचा वापर करण्यावर निर्बंध आहेत. तरी सुद्धा सरकार न्यायालयाच्या आदेशांचे पालन करत नाही. यापुढे मॅनहोलमध्ये कर्मचाऱयांना उतरविल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.
Previous Articleमुख्यमंत्र्यांच्या भोजनावळीला अनेकांची पाठ
Next Article मंगळूरमध्ये 45 विद्यार्थ्यांना कोरोना
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.