नवी दिल्ली
भारताचा गॅझेट ऍक्सेसरीज आणि कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड यूबॉनने मॅजिक चार्जर यूबॉन सीएच 99 सादर केला आहे. जो 4 इन 1 चार्जर राहणार आहे. म्हणजे एकाच चार्जवर चार उपकरणे चार्ज करण्याची सुविधा मिळणार आहे. सदरच्या चार्जरची किमत ही 699 रुपये राहणार आहे. यूबॉन सीएची विशेष वैशिष्टय़े म्हणजे यामध्ये मोबाईल होल्डरही मिळणार आहे. यूबॉन सीएच 99 सोबत दोन चार्जिंग पाँईट मिळणार असून ज्यामध्ये यूएसबी पोर्ट प्राप्त होणार आहे. या मॅजिक चार्जरला या प्रकारे डिझाईन करण्यात आले आहे, की याला प्रवासादरम्यानही सहज वापरता येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. यूबॉन सीएच 99 सोबत 2.6 ऍम्पियर आणि 2.6 ऍम्पियरचे फास्ट चार्जेग मिळणार आहे. सदरच्या मॅजिक चार्जरसोबत 1 मीटरची मायक्रो यूएसबी केबल मिळणार आहे.









