नवी दिल्ली
विविध व्यवसायांमध्ये कार्यरत असणाऱया मॅक्स समूहाने मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनीमधील 13 टक्क्यांचा वाटा ऍक्सिस बँकेला विकला आहे. जी आता विमा कंपनीची सहयोगी राहणार आहे. जवळपास एक वर्षाच्या अगोदर मॅक्स फायनान्शिअल सर्व्हिसेसने आपल्या विमा व्यवसायात ऍक्सिस बँकेसोबत करार करण्याची योजना आखली होती.
शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार मॅक्स लाईफची होल्डींग कंपनी मॅक्स फायनान्शिअल सर्व्हिसेसने ऍक्सिस बँक आणि सहयोगी कंपन्यांनी ऍक्सिस कॅपिटल आणि ऍक्सिस सिक्युरिटीज लिमिटेडला विमा कंपनीची 12.99 टक्क्यांची हिस्सेदारी दिली आहे.
मॅक्स फायनान्शिअल सर्व्हिसेसने दिलेल्या माहितीनुसार मॅक्स लाईफच्या संचालक मंडळाने सदरच्या व्यवहाराला अंतिम रुप दिलेले आहे. यासोबतच विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडून फेब्रुवारीत याला तत्वता मंजुरी दिल्याची माहिती आहे.