मुंबई :
मॅक्स इंडिया वर्तमान काळात समभागधारकांकडून 92 कोटी रुपयांचे समभाग पुन्हा खरेदी करणार आहे. याच्यासाठी कंपनीने 85 रुपये प्रति समभागाची किंमत निश्चित केली आहे. ही खरेदी कॅपिटल रिडक्शन प्रोगॅमसह करण्यात येणार आहे, अशी माहिती कंपनीने एनएसईला दिलेली आहे. कंपनीचे समभाग 14 सप्टेंबर रोजी 62 रुपयांवर बंद झाले होते. याचा अर्थ 37 टक्क्मयांच्या प्रीमियमवर कंपनीचे समभाग खरेदी केले जाणार आहेत.
मॅक्स इंडिया ही मागील महिन्यात डिमर्जर प्रक्रियेसह 28 ऑगस्ट रोजी स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट झाली आहे. कंपनीजवळ टेझरी कॉर्पसच्या रुपात 400 कोटी रुपये आहेत. ही रक्कम पहिल्यापासून याच्या सब्सिडियरी मॅक्सच्या पुनर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेमधून मिळाली आहे. यामध्ये कंपनी 92 कोटी रुपये समभाग खरेदीवर खर्च करणार आहे.
मॅक्स इंडियाने दिलेल्या माहितीनुसार कंपनी कॅपिटल रिडक्शन प्रोगॅमसह समभागधारकांना हा रिवार्ड देणार आहे. कंपनी 20 टक्के समभाग होल्डिंग्स खरेदी करणार आहे. 400 कोटी रुपयांमधील 300 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा वापर हा वृद्धी तसेच अन्य बाबींवर खर्च केला जाईल.









