वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मॅक्सिमाने आपले नवीन स्मार्टवॉच मॅक्स प्रो एक्स 6 लाँच केले आहे. सदरचे वॉच प्रीमियम सिरेमिक फिल बॅक आणि मॅटेलिक केससोबत येणार आहे. मॅक्सिमा मॅक्स प्रो एक्स 6ची सुरुवातीची किमत ही 3999 रुपये ठेवण्यात आली आहे. सदरचे घडय़ाळ हे वॉटरप्रफूसोबत मिळणार आहे. ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. यामध्ये 10 दिवसांचे बॅटरी बॅकअप मिळणार असून वॉच ब्लॅक आणि सिल्वर कलरमध्ये खरेदी करता येणार आहे.
स्मार्टवॉच फिचर
w वॉचमध्ये 1.7 इंच सुपर ब्राइट एचडी डिस्प्ले
w स्क्रीनचा ब्राइटनेस 400 निट्सला मिळणार आहे.
w मॅक्स प्रो एक्स 6 मध्ये ब्लूटय़ूथ कॉलिंगचा फिचर
w वॉचमध्ये एआय स्लीप मॉनिटर आणि एसपीओ2/ कंटीन्यूअस हार्टरेट मॉनिटर दिला आहे.









