नवी दिल्ली
रियल इस्टेट फर्म मॅक्रोटेक डेव्हलपर्सने दिलेल्या माहितीनुसार लंडनमधील दोन प्रकल्पांमधून डिसेंबरमध्ये समाप्त झालेल्या तिमाहीत जवळपास 1,900 कोटी रुपयाचे बुकिंग प्राप्त झाले आहे.
मुंबईची कंपनी मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड मालमत्तेची विक्री लोढा ब्रॅण्डसह करत असते. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार कंपनीला डिसेंबरअखेरच्या तिमाहीमध्ये ब्रिटनमधील प्रकल्पातून बुकिंग प्राप्त झाले आहे. गुंतवणूक रक्कम साधारणपणे आर्थिक वर्ष 2023 मध्ये भारताला परत मिळणार आहे.









