वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
येथे सुरू असलेल्या एटीपी टूरवरील सिटी खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेचा मॅकडोनाल्ड आणि इटलीचा सिनेर यांच्यात एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल.
पुरूष एकेरीच्या उपांत्य सामन्यात मॅकडोनाल्डने जपानच्या निशीकोरीचा 6-4, 3-6, 7-5 असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. मॅकडोनाल्डला विजयासाठी जवळपास तीन तास झगडावे लागले. दुसऱया उपांत्य सामन्यात इटलीच्या 24 व्या मानांकित जेनिक सिनेरने कॅलिफोर्नियाच्या 20 वर्षीय ब्रुक्सबायचा 7-6 (7-2), 6-1 असा पराभव केला. सदर स्पर्धा हार्डकोर्टवर खेळविली जात आहे.









