अंत्यसंस्कारासाठी अनोखी कल्पना
माणसाच्या मृत्यूनंतर विविध समुदायांमध्ये अंत्यसंस्कारांच्या वेगवेगळय़ा परंपरा आहेत. तर काही ठिकाणी रीति-रिवाजांनुसार मृतदेहावर अग्निसंस्कार केले जातात. तर काही ठिकाणी मृतदेह दफन केला जातो. पण मृत्यूनंतर शरीराला वृक्षाचे स्वरुप देण्याची कल्पना इटलीच्या एका कंपनीने मांडली आहे. इटलीच्या कॅप्सुला मुंडी नावाच्या कंपनीने मृत व्यक्तींच्या शरीराला एका विशेष प्रकारच्या पॉडमध्ये ठेवून त्याला वृक्षांमध्ये बदलण्याची कल्पना समोर ठेवली आहे.
या विशेष पॉडला ऑर्गेनिक बरियल पॉड्स म्हटले जात आहे. म्हणजे एक असे अंडाकृती कॅप्सूल जे कार्बनिक आहे. याच्यातच मृतदेह ठेवण्यात येणार आहे. मृतदेहाला यात एखाद्या महिलेच्या गर्भात भ्रूण राहतो त्याप्रकारे ठेवण्यात येणार आहे.

भ्रूणाप्रमाणेच ऑर्गेनिक बरियल पॉड्समध्ये ठेवण्यात आलेल्या मृतदेहाला कॅप्सुला मुंडी कंपनी एक बीज म्हणून पाहत आहे, ज्यावर एक झाड असणार आहे. कॅप्सुला मुंडीचा हा ऑर्गेनिक बरियल कॅप्सुल स्टार्च प्लास्टिकने तयार करण्यात आला आहे. हे प्लास्टिक जमिनीत पूर्णपणे विघटित होणार आहे.
हा पॉड विघटित होताच मृतदेहाचेही अस्तित्व संपणार आहे. मृतदेह पूर्णपणे जमिनीत सामावला जाईल. शरीर विघटित झाल्याने तयार होणारे घटक रोपाच्या लागवडीला हातभार लावणार आहेत.
कुठल्याही झाडाला पूर्णपणे विकसित होण्यास 10 ते 40 वर्षांचा कालावधी लागतो. पण ऑर्गेनिक बरियल पॉड्स एका आठवडय़ातच त्यांना भरपूर पोषक घटक प्रदान करणार आहे. तसेच मृत व्यक्तीचे कुटुंबीय या रोपाची देखभाल करतील असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.









