उंदिर, खार, ससा, हरिण केली फस्त
ब्रिटनमध्ये राहणाऱया एका महिलेला अजब छंद आहे. ही महिला एका आदिवासीप्रमाणे जीवन जगणे पसंत करते. 34 वर्षीय सारा डे स्वतःला केव्ह वुमन म्हणवून घेतले आणि रस्ते अपघातांमध्ये मारले गेलेल्या प्राण्यांचे मांस खायला तिला आवडते.
सारा प्राण्यांना स्वतः मारून खात नाही, तर रस्ते दुर्घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेले प्राणी किंवा पक्ष्यांना ती खात असते. या प्राण्यांच्या हाडांचा वापर करत ती उपकरो आणि अस्त्रांची निर्मिती करते. कबूतराचे मांस सर्वाधिक पसंतीचे असल्याचे ती सांगते.

कोलचेस्टरची रहिवासी असलेली सारा आठवडय़ात एकदा तरी रस्त्यावर मृत्युमुखी पडलेल्या प्राण्यांचे मांस अवश्य फस्त करते. परंतु अनेकदा तिला प्राणी मिळत देखली नाहीत. माझा फ्रीज रस्ते दुर्घटनांमध्ये मारले गेलेल्या प्राण्यांनी भरलेला असतो. अनेकदा तर हरिण आणि ससा यासारख्या प्राण्यांचे मांस दीर्घकाळासाठी फ्रीजमध्ये ठेवत असल्याचे साराने सांगितले आहे.
उंदरांचे मांस हे खारीशी मिळतेजुळते आहे. तर कबूतराचे मांस ज्युसी आणि उष्ण असते असे ती सांगते. ती सामान्य लोकांप्रमाणे देखील आहार घेत असते. सर्वसामान्यांप्रमाणे सुपरमार्केटमधून अनेक गोष्टी खरेदी करत असते. रस्ते दुर्घटनेत मारले गेलेल्या प्राण्यांना खाते कारण लहानपणापासूनच मला पाषाणयुगाबद्दल आकर्षण राहिले आहे. आदिमानवाप्रमाणे जगण्याची इच्छा असल्याचे तिने म्हटले आहे.
स्वतःचे घर कसे तयार करावे, आग कशी निर्माण करावी अणि रस्त्यात मारले गेलेल्या प्राण्यांचा आहारासाठी उपयोग कशाप्रकारे करावा हे शिकले आहे. मी स्वतःला केव्ह वुमन मानते, माझे घर शहरात असले तरीही जंगलात तंबूमध्ये राहणेच मला पसंत आहे. हरिणीच्या कातडीपासून स्वतःसाठी स्लीपिंग बॅग तयार केली आहे. तसेच कातडीपासून स्वतःसाठी कपडेही तयार केल्याचे तिने म्हटले आहे.









