कबनूर/ प्रतिनिधी
एका नामवंत सूत गिरणीतील प्रोडक्शन मॅनेजर यांचा अचानक मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .तसेच पत्नीसह तिघांचाअहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे साजणी गावात व परिसरात खळबळ माजली असून बाधित संख्या चार वर पोहोचली आहे.
साजणी तालुका हातकणंगले गावानजीक असलेल्या एका नामांकित सूतगिरणीचे प्रॉडक्शन मॅनेजर यांना रविवारी रात्री छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना कोल्हापूर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मध्यरात्री मृत्यू झाला. मृत्यूनंतर तपासणी मध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले. त्याच प्रमाणे त्यांची पत्नी, मुलगा व सूत गिरणीचे सुपरवायझर यांचेही स्वॅब तपासणी केल्यानंतर हे तिघेही पॉझिटिव्ह आल्याचे आढळून आले. त्यामुळे साजनी गावात एकूण चार रुग्ण पॉझिटिव्ह झाले असून गावात खळबळ माजली आहे व भीतीचे वातावरण पसरले आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या15 जणांचे स्वॅबत पासणीसाठी पाठविण्यात आले असून अजूनही अहवाल प्राप्त झालेला नाही. या 15 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान सूतगिरणी परिसर पूर्णपणे सील करण्यात येऊन त्या परिसरात निर्जंतुकीकरण औषध फवारणी करण्यात आली आहे. गावकऱ्यांनी भीती ने घाबरून न जाता आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आव्हान सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी केले आहे








