मित्रांनी नैवद्य म्हणून ठेवलेल्या केकवर कावळ्याने मारली चोच, सांगरूळच्या प्रतीक गुरवच्या रक्षाविसर्जनात घडलेली घटना
सांगरूळ / प्रतिनिधी
रविवारी त्याचा वाढदिवस .चार दिवस अगोदर त्याला वाढदिवसाचे वेद .त्याचे मन पूर्णपणे वाढदिवसाच्या स्वप्नात गुंतलेले .पण नियतीने डाव साधला आणि वाढदिवसाच्या अगोदर दोन दिवस त्याला काळाने हिरावून नेले .वाढदिवसा दिवशीच रक्षाविसर्जन करण्याची कुटुंबीयांसह मित्रपरिवार यांचेवर दुर्देवी वेळ आली. घरच्यांनी व मित्रपरिवार आणि रक्षा विसर्जन दिवशी नैवेद्य म्हणून ठेवलेल्या केकला कावळ्याने चोच मारली आणि मृत्यूनंतरही त्याने मैत्रीचे नाते घट्ट असल्याचे दाखविले.
सांगरूळ (ता. करवीर )येथील प्रतीक प्रकाश गुरव ( वय १७ ) याचे गुरुवार दिनांक १४ रोजी रात्री औषधाची गोळी खाताना ठसका लागल्याचे निमित्त झाले आणि त्यातच त्याचे निधन झाले . घरापेक्षा मित्रपरिवारात जास्त रमून जाणाऱ्या प्रतीक्षा अशा अचानक निघून जाण्याने कुटुंबीयांसह मित्र परिवार व ग्रामस्थांचे मन हेलावून गेले . प्रतीकच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी मित्रपरिवारासह ग्रामस्थांची दोन दिवस त्याच्या घराकडे रीघ लागली . वाढदिवसाच्या स्वप्नात पूर्णपणे रंगून गेलेल्या प्रतीकच्या अचानक जाण्याची व वाढदिवसा दिवशीच त्याची रक्षा भरण्याच्या दुर्देवी घटनेची सर्वत्र चर्चा रंगू लागली.
प्रतीकचे वाढदिवसा मध्ये गुंतलेले मन ओळखून रक्षाविसर्जनावेळी कुटुंबीयांनी मित्रपरिवाराने नैवेद्य म्हणून वाढदिवसाचे केक ठेवले. तासाभराच्या प्रतीक्षेनंतर रक्षाविसर्जन साठी आलेल्या ग्रामस्थ व पै पाहुण्यांनी मशान गेटमधून बाहेर निघण्यास सुरुवात केली .पण प्रतीकचे मित्रपरिवार तेथेच ठाण मांडून उभा राहिला . आणि क्षणातच कावळ्याने केकला चोच मारली .आणि एक प्रकारे मृत्यूनंतरही मैत्री किती घट्ट असल्याचे दाखवून दिले .यामुळे प्रतीकच्या मित्र परिवाराच्या चेहर्यावर दुःखातही समाधानाचे भाव पसरले.
दिवसभर गावात या घटनेची ग्रामस्थामधून चर्चा सुरू आहे. त्याच्या मित्रांच्या फोनच्या स्टेटसवर प्रतीक मानलं तुला भावा वारल्यानंतर ही मित्रांचा मान ठेवलास आणि त्यांनी आणलेला केक पसंंद केलास, धन्य ती मैत्री शब्दच नाही भावा असा मेसेज फिरू लागला.









