बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांनी दक्षिणेकडील किनार्यावरील जिल्ह्यांचा दौरा केला. यावेळी मंत्री सुधाकर यांनी या जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी बोलताना त्यांनी, “दक्षिणा कन्नड जिल्ह्यात सध्या मृत्यूदर कमी असू शकेल पण याचा अर्थ असा नाही की कोरोना विरुद्धच्या लढाईत शिथिलता दिली जाणार नाही. कुणालाही तसा प्रवेश दिला जाणार नाही. यासाठी सर्व नियमांचं पालन करावं लागणार आहे. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
मार्चच्या प्रारंभापासून दक्षिणा कन्नडमध्ये १,२११ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर बहुतेक रूग्णांनी प्रवास केला होता. तसेच त्यांच्या अन्य लोक त्यांच्या संपर्कात होते.