ऑनलाईन टीम / मुंबई :
भिवंडीच्या समदनगर परिसरात मूलचंद कंपाउंमधील गोदामांना काल रात्री लागलेली आज अजूनही सुरूच आहे. अग्निशमन दलाचे जवान मागील सहा तासांपासून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
काल रात्री मूलचंद कंपाउंमधील दोन गोदामांना अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आगीने रुद्र रुप धारण केल्याने शेजारी असणाऱया नागरी वस्तीतील लोकांनी सुरक्षित स्थळी आसरा घेतला. मागील सहा तासांपासून अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
या आगीत मोठय़ा प्रमाणात वित्त हानी झाली असली तरी देखील सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.









