विश्वकर्मा विकास संघटनेतर्फे निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
हासन येथे पुरातन श्री लक्ष्मी मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये कालिका देवीची मूर्ती होती. त्या मूर्तीची मोडतोड काही समाजकंटकांनी केली आहे. तेंव्हा त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विश्वकर्मा विकास संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. हासन जिल्हय़ातील या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. ही घटना घडून देखील बरेच दिवस उलटले. तरी देखील समाजकंटकांवर कारवाई करण्यात आली नाही. तेंव्हा तातडीने त्यांच्यावर कारवाई करावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रमेश बडीगेर, कृष्णा हुबळी, मंजुनाथ पत्तार, अनिल सुतार, रवी पत्तार, राघवेंद्र हावनूर आदी उपस्थित होते.









