प्रतिनिधी / दिघंची
मागील दोन दिवसात झालेल्या मुसळधार वादळी पाऊसाने दिघंची परिसरात हाहाकार उडाला आहे. दिघंचीसह परिसरातील गावांना याचा जोरदार फटका बसला आहे. दिघंचीमधील माणगंगा नदीवरील यादव वस्ती बंधाऱ्याचा भराव पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला तर अनेक गावांत माळवदी घरांची पडझड झाली. अनेक गावांचा संपर्क तुटला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने म्हसवड परिसरात झालेल्या पावसाचे पाणीदेखील दिघंची येथील माणगंगा नदीला येऊन मिळते. शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने येथील माणगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे दिघंची यादव वस्ती बंधाऱ्याचा भराव वाहून गेला त्यामुळे खवासपूर मधील काही घरात पाणी शिरले प्रचंड मोठ्या पावसामुळे अचानक पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे भराव घातला व पाण्याबरोबर वाहून गेला. बंधारा फुटला अशी अफवा काही काळ पसरली परंतु आपल्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन सरपंच अमोल मोरे यांनी केले असून नदीकाठच्या लोकांनी दक्षता घेण्याचे आवाहन करत नागरिकांनी पाणी जास्त असल्याने धाडसाने जीवितास धोका होईल असे कृत्य करू नये असे आवाहन सरपंच अमोल मोरे यांनी केले आहे.
अनेक पूल पाण्याखाली गावांचा संपर्क तुटला
मुसळधार वादळी पाऊसाचा जोर एवढा होता की या पावसामुळे परिसरात ढग फुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. प्रचंड पावसाळ्यात पावसाच्या प्रवाहाने दिघंची ढोले मळा येथील पूल पाण्यात वाहून गेला तर लिंगीवरे राजेवाडी हा फुल गेली दोन दिवस पाण्याखाली असून पूर्णपणे या रस्त्यावरील वाहतूक बंद आहे तसेच निंबवडे येथील आटपाडी कडे जाणारा पूल देखील पाण्याखाली गेला असून पाण्याखाली गेला.
शनिवारी सकाळी आटपाडी कडून निंबवडे कडे येणारा फरशी कामगार या पुलावरून वाहून जाताना येथील युवकांनी त्याला वाचवले.सुदैवाने जीवितहानी टळली.तसेच दिघंची गाव ओढा देखील भरल्याने या ठिकाणचा पूल पाण्याखाली गेला असून मसवडकडे जाणारी सर्व वाहतूक विस्कळीत झाली तसेच शुक्रवारी रात्री विठलापूर ओढ्यावरून पाणी वाहू लागल्याने दिघंची आटपाडी वाहतूक देखील बंद झाली होती. एकंदरीत वादळी पावसाने अनेक पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
पाऊसाने शेतकरी उध्वस्त….
आधीच दुष्काळ पाचवीला पुजलेला होता दुष्काळाची लढत लढत या भागातील शेतकरी आपली शेती करत होता. आत्ता सुगीचे दिवस आले होते, पिके हाताला येणार तोपर्यंत या अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्याचे अक्षरशा कंबरडे मोडले आहे. शेकडो हेक्टर ऊस पाण्यात पडला आहे. बाजरी मका ही पिके पाण्यात पडून कुजण्यास सुरुवात झाली आहे. अनेक अनेक रोगांपासून बचाव करत डाळिंब बाग फुलवणाऱ्या शेतकऱ्यांच्या बागांचे या पाऊसाने मोठे नुकसान झाले आहे. भागातील सर्व पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी दिघंची ग्रामपंचायत सदस्य सागर ढोले यांच्यासह सोमनाथ कुंभार ,जीवन मोरे यांनी यांनी केली आहे.
दिघंची,राजेवाडी,निंबवडेत घरांची पडझड
अचानक झालेल्या वादळी पाऊसाने दिघंची, राजेवाडी, निंबवडे येथील माळवदी जुन्या घरांची पडझड झाली आहे. परंतु सुदैवाने जीवित हानी झाली नाही. शुक्रवारी आटपाडीमध्ये भिंत पडून दोन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून काळजी म्हणून जुन्या पडझड होईल अशा घरांमधून नागरिकांनी स्थलांतर करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.एकंदरीत वादळी पाऊसने परिसरात हाहाकार माजवला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








