वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दक्षिण आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत पुरूषांच्या 49 किलो वजनगटात सुवर्णपदक मिळविणारा भारताचा मुष्टियोद्धा विनोद तनवर याला कोरोनाची बाधा झाली असल्याने त्याने दुबईत होणाऱया आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेतून माघार घेतली आहे.
23 वर्षीय विनोद तनवारने गेल्या महिन्यात रशियात झालेल्या मुष्टियुद्ध स्पर्धेत भाग घेतला होता. पतियाळा येथे प्रशिक्षण सरावासाठी दाखल झाल्यानंतर त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली. या चाचणी तो पॉझिटीव्ह असल्याने आढळून आले. विनोद तनवारला कोरोना समस्येमुळे दुबईतील आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेला मुकावे लागत असल्याची माहिती अखिल भारतीय मुष्टियुद्ध संघटनेच्या प्रवक्त्याने दिली आहे.