अहमदाबाद : सईद मुश्ताक अली करंडक टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेत येथे शुक्रवारी तामिळनाडू आणि राजस्थान तसेच पंजाब आणि बडोदा यांच्यात उपांत्य लढती होणार आहेत. उपांत्य सामन्यात तामिळनाडूचे राजस्थानवर वर्चस्व राहील तर बडोदा संघाविरूद्ध पंजाबचे पारडे जड आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
2021 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी 18 फेब्रुवारीला क्रिकेटपटूंचा लिलाव होणार आहे. दरम्यान तामिळनाडू- राजस्थान यांच्यातील खेळाडू दर्जेदार कामगिरी करून आयपीएल प्रँचायजीचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतील. तामिळनाडूच्या शाहरूख खानने हिमाचलप्रदेश विरूद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दर्जेदार कामगिरी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता.









