पाकिस्तानमध्ये उपचार, तालिबानमध्ये अंतर्गत संघर्ष
काबूल / वृत्तसंस्था
सरकार स्थापन करण्याआधीच अफगाणिस्तानमध्ये तालिबानमधला अंतर्गत संघर्ष वाढू लागला आहे. ज्येष्ठ नेते मुल्ला बरादर यांचे नाव नव्या सरकारचे प्रमुख म्हणून चर्चेत होते. तथापि, त्यांच्यावर प्रतिस्पर्धी गटाकडून गोळीबार झाल्यग्नाचे वृत्त आहे. ते या हल्ल्यात जखमी झाले असून त्यांच्यावर पाकिस्तानमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर हक्कानी नेटवर्कककडून हल्ला झाल्याचे सांगण्यात येते.
तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेऊन आता दोन आठवडय़ांचा कालावधी झाला आहे. तरीही तेथे सरकारची स्थापना झालेली नाही. सरकारमधील महत्वाच्या पदांसाठी तालिबानमधील विविध गटांमध्ये गळेकापू स्पर्धा सुरु झाली असून एकमेकांवर हल्ले होत आहेत. अशाच एका घटनेत मुल्ला अब्दुल गनी बरादर यांचा गट आणि हक्कानी नेटवर्क एकमेकांशी भिडले होते.
हक्कानी नेटवर्कचे नेते अनास हक्कानीं आणि बरादर यांचे हस्तक यांच्यात संघर्ष झाला असल्यग्नाचे वृत्त पंजशीर ऑब्झर्व्हर या वृत्तपत्राने दिले आहे. मात्र, त्याला अधिकृतरित्यग्ना दुजोरा मिळालेला नाही. या दोन गटांमध्ये खुर्चीसाठी लढाई सुरु झाली आहे, असे वृत्त या देशातील माजी महिला लोकप्रतिनिधी मारियम सुलेमानखिल यांनींही दिले. मुल्ला बरादर यांनी या देशाचे नेतृत्व करावे, अशी पाकिस्तानची इच्छा नाही, असे या महिला प्रतिधिचे म्हणणे आहे.
पुढच्या आठवडय़ात सरकार
तालिबानने शुक्रवारी सरकार स्थापन करणार अशी घोषणा केली होती. तथापि, अंतर्गत चढाओढीमुळे एकमत बनविणे अशक्य झाल्याने सरकार स्थापन पुढे ढकलली गेली. आता पुढील आठवडय़ात त्याची स्थापना होईल, असे सांगण्यग्नात आले आहे. नव्या सरकारमध्ये तालिबानमधील सर्व गटांना स्थान दिले जाईल, असे वृत्त अल् जझिरा या संस्थेने दिले आहे. नवे सरकार जनतेला सुरक्षा देईल, असे नवे आश्वासन तालिबानने रविवारी वक्तव्यात दिले आहे.
काबूल विमानतळ सुरु
31 ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद झालेला काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळ आता अंशतः सुरु करण्यात आला आहे. स्थानिक विमान उड्डाणे सुरु झाली आहेत. हेरात आणि मझारे शरीफ येथे विमानसेवा प्रारंभ करण्यात आली. कतारहून तंत्रज्ञांचे एक पथक विमानतळावर पोहचले असून त्याने तळाची डागडुजी करण्यग्नाचे काम हाती घेतले आहे. स्थिती पूर्ववत होण्यग्नाची शक्यता आहे. विदेशातून साहाय्य सामग्री घेऊन येणाऱयग्ना विमानांना अनुमती देण्यग्नात आली आहे.
अमेरिकेच्या मंत्र्यांकडे मागणी
अमेरिकेचे एक लोकप्रतिनिधी माईक वाझ यांनी काबूल विमानतळावरुन खासगी विमानवाहतून सुरु करण्यात तालिबानला भाग पाडावे, अशी मागणी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अँटोनी ब्लिंकन यांना केली आहे. खासगी विमानांना अनुमती मिळविल्यास त्या देशातून आणखी नागरीकांची सुटका करणे शक्य होईल. अमेरिकेला समर्थन देणारे आणखी बरेच लोक तेथे अद्याप अडकून पडले आहेत. त्यांना सोडविण्याची जबाबदारी अमेरिकेची आहे, असे वाझ यग्नांनी स्पष्ट केले.