ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणावर प्रतिक्रीया देताना उत्तरप्रदेशच्या बालिया मतदार संघातील भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी मुक्ताफळे उधळली आहेत. मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होतात, असे वादग्रस्त वक्तव्य सिंह यांनी केले आहे.
रामराज्याचा दावा करणाऱ्या उत्तरप्रदेशात बलात्कारांच्या घटना घडत आहेत, यामागचं कारण काय, असा प्रश्न माध्यमांनी सिंह यांना विचारला होता.त्यावर उत्तर देताना सिंह म्हणाले, आपल्या मुलींना संस्कारीत करणे. तसेच त्यांना समाजात राहणे, वागणे, व्यवहार करण्याच्या पद्धती शिकवणे ही प्रत्येक मुलींच्या आई-वडिलांची जबाबदारी असते.चांगल्या संस्कारांनीच बलात्कारांसारख्या गोष्टी थांबवल्या जाऊ शकतात. अशा घटनांना सरकार किंवा तलवारी रोखू शकत नाहीत.