प्रतिनिधी/करमाळा
तालुक्यातील जिंती येथे एकुलत्या एका मुलाने वेडाच्या भरात बेदम मारहाण केल्याने वृद्ध पित्याचा मृत्यू झाला. राजाराम मारुती जगताप (वय 75) असे मृताचे तर अंकुश राजाराम जगताप असे मारहाण करणाऱया मुलाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, जिंती येथील राजाराम जगताप यांना अंकुश नावाचा एकुलता एक मुलगा. त्याचे लग्न झाले आहे. त्याला दोन मुले आहेत. गत काही वर्षांपासून त्याच्या डोक्मयावर परिणाम झाला होता. त्याला काही दिवस मनोरुग्णालयात दाखल केले होते. पण तो पूर्ण बरा झाला नव्हता. तो दारू पिऊन दिवसभर रेल्वे गेट ते गावात चकरा मारत असे. एक वर्षापासून त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी गेली आहे. जगताप यांची वस्ती गावाच्या बाहेर एकटीच आहे.
गुरुवारी (ता. 2) रात्री अंकुशने दारू पिऊन, वेडाच्या भरात वडिलांना बेशुद्ध पडेपर्यंत मारले. सकाळी ही माहिती येथील जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी राजेभोसले यांना समजली. त्यांनी राजाराम जगताप यांना करमाळा उपचारासाठी येथे पाठवले. परंतु त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांना ही माहिती कळविण्यात आली. त्यांनी मृतदेह कुटीर रुग्णालयात तपासणीसाठी पाठवला असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे. घरात अन्य कोणी नसल्याने या प्रकरणी पोलिसांनाच फिर्यादी व्हावे लागणार आहे.