प्रतिनिधी/बेळगाव
मारिहाळ पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील कबलापूरजवळ खासगी कंपनीत नोकरी करणाऱया एका युवकाचा भीषण खून झाला होता. 25 डिसेंबर रोजी खुनाला एक महिना पूर्ण होतो. तरीही अद्याप खुनी कोण? याचा तपास लागलेला नाही. त्यामुळे उदगिर, जिल्हा लातूर येथील त्याच्या कुटुंबीयांनी बेळगावात उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
निशिकांत सुभाषराव दहीकांबळे (वय 31), मूळचा राहणार उदगिर, सध्या राहणार बेळगाव असे खून झालेल्या दुर्दैवी युवकाचे नाव असून 25 नोव्हेंबर रोजी रात्री त्याचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला होता. दुसऱया दिवशी सकाळी कबलापूरजवळ खून झालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला.









