दर महिन्याला विकले जातात 200 फ्लॅट्स
युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये एक कम्फर्ट सिटी वसलेली आहे. पाहताना हे शहर एखाद्या लँडस्केप पेंटिंगसमान भासते, तसेच मुलांच्या रंगबिरंगी खेळण्यांची आठवण करून देणारे हे शहर आहे. या शहरात 1950 आणि 60 च्या दशकात निर्माण करण्यात आलेले सोव्हिएत टॉवर्स देखील आहेत. त्यांच्यासोबत विविध रंगांच्या इमारती अत्यंत सुंदर वाटू लागतात. पूर्ण कम्फर्ट सिटी एखाद्या डिस्नेलँड चित्रपटातील एखाद्या दृश्याप्रमाणे वाटते.
येथील घरांना लीगो टॉयजप्रमाणे डिझाइन करण्यात आले आहे. विविध रंगांनी सजविण्यात आलेल्या इमारती पाहून लोक थक्क होतात. या शहरातील जुन्या करडय़ा रंगातील इमारतींना वेगळा लुक देण्यासाठी सुंदर रंग देण्यात आला आहे.

लाल, पिवळा, हिरवा, जांभळा तसेच अन्य रंगांनी भिंतीपासून छत तसेच दरवाजेही रंगविण्यात आले आहेत. पूर्ण दृश्य मुलांची लीगो बील्डिंग्स किंवा पॉप्युलर बोर्ड गेम मोनोपोलीप्रमाणे दिसून येते.
दमायरो वॅसीलीव्ह, एलेक्सैंड्र पोपोव्ह आणि ओल्गा एल्फिरोवा यांनी या जागेला डिझाइन केले आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यास त्यांना एकूण 11 वर्षे लागली आहेत. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आमच्याकडे खूपच मर्यादित निधी होता असे त्यांनी सांगितले आहे. लीगो टाउनमध्ये सध्या 20 हजार लोकांचे वास्तव्य आहे.
साधारण सामग्री आणि तंत्रज्ञानाचा वापर करत डिझाइनर्सनी कल्पकतेचा भरपूर वापर केला आहे. या पूर्ण शहरात 8,500 फ्लॅट्स निर्माण करण्यात आले आहेत. एका अहवालानुसार दर महिन्याला तेथे 200 फ्लॅट्ची विक्री होत असल्याचे वॅसीलीव यांनी सांगितले आहे.









