प्रतिनिधी / मिरज
मुलगी जन्माला आली म्हणून नवऱ्याने शारिरीक व मानसिक छळ करुन मारहाण केल्याची तक्रार श्रावणी शैलेश पवार (वय 26, रा. नदीवेस पवार गल्ली, विठ्ठल मंदिर, मिरज) या विवाहितेने शहर पोलिसात दिली आहे. विवाहितेच्या तक्रारीवरुन तिचा पती शैलेंद्र रामचंद्र पवार (वय 33) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
शैलेंद्र पवार आणि श्रावणी पवार या दोघांचा चार वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. लग्नानंतर श्रावणी हिला एक मुलगी झाली. हे दोघे काही काळ मुंबई येथे रहात हेते. मात्र, नवरा आणि सासरच्या मंडळींना मुलगा हवा होता. त्यामुळे त्यांनी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन श्रावणी यांचा छळ करण्यास सुरूवात केली.
माहेरी गेलीस की आईला आणि बहिणीला फोन का करत नाहीस, आईला घरची कामे का लावतेस, खराब झालेले ताक आईला न विचारता का टाकून दिले, मुलगीच जन्माला का घाटलीस असे म्हणून वारंवार मारहाण करून छळ केल्याची तक्रार सदर विवाहितेने शहर पोलिसात दिली आहे.








