मुरगूड / वार्ताहर
मुरगूडातील सरपिराजी रोडवरील पती आकाश क्षीरसागर यांची पत्नी राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता दि. २४ रोजी सायंकाळी ५ वा. अचानकपणे बेपत्ता झाली आहे. बेपत्ता महिलेचे वडील विलास शंकर शिंदे (वय वर्षे -56 ) धंदा- शेती रा. एकोडी ता.कागल जि. कोल्हापुर यांनी मुरगूड पोलिस ठाण्यात आपली मुलगी बेपता झाल्याची वर्दी दिली आहे.
सुरेखा आकाश क्षीरसागर वय- 26 वर्षे रा.मुरगुड ता.कागल असे बेपत्ता महिलेचे नाव असून ती रंगाने गोरी, अंगाने मध्यम, उंची 5.00 फुट, केस काळे व लांब , चेहरा गोल , डाव्या गालावर तिळ, डोळे काळे, नाक सरळ, अंगात पांढऱ्या रंगाची सहावारी साडी त्यावर भगव्या रंगाचा पट्टा असलेला पदर, भगव्या रंगाचे ब्लॉउज, कानात रिंगा, गळ्यात मनी मंगळसुत्र , पायात पैंजन व जोडवी, हातात काचेच्या हिरव्या बांगड्या, मराठी भाषा बोलते. अधिक तपास सहाय्यक पोलिस करीत आहेत.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









