अडीच महिन्यात पुन्हा फुटली चर
मुरगूड / वार्ताहर
अडीच महिन्यापूर्वी ढगफुटीच्या पावसाने उद्धवस्त झालेल्या मुरगूडपैकी जांभूळखोरा वसाहतीतील नागरिकांचे पुन्हा एकदा कंबरडे मोडून चर फुटीचा फटका बसला आहे. गुरुवारी रात्री झालेल्या ढगफुटीमुळे प्रचंड पाण्याचा प्रवाह सर पिराजी तलावाच्या कॅनॉलमधून दुसऱ्यांदा दोन ठिकाणी फुटल्यामुळे बाहेर पडल्यामुळ चारशे ते पाचशे एकर क्षेत्रातील उभ्या पिकांसह शेतीचे अपरिमित मोठे नुकसान झाले. यात ४० ते ५० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. उभ्या पिकांबरोबर विहीरी व मोटरींचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
चर फुटीचा बंदोबस्त करावा
परिसरातील ऊस पिकाबरोबर सुपीक मातीचा थर पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहुन गेला आहे. वारंवार होणाऱ्या या चरफुटीचा फटका येथील शेतकऱ्यांना बसत आहे . अडीच महिन्यापुर्वी झालेल्या चर फुटीने लाखो रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागले आहे. त्यामुळे चर फुटीचा बंदोबस्त तलाव प्रशासनाने तातडीने करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
Previous Article`एमपीएससी’परिक्षेसाठी मराठा विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ४३ करावी
Next Article पिक नुकसान भरपाई मिळणार, पण तुटपुंजी









