प्रतिनिधी/ वास्को
डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटिलिजन्सच्या (डीआरई) पथकाने मुरगाव बंदरातील 24 कंटेनर जप्त केले आहेत. या कंटेनरमध्ये असलेला माल बेकायदा निर्यात करण्याचा संबंधीत कंपनीचा प्रयत्न होता. नॅचरल गार्नेट हा माल या कंटेनरमध्ये असून त्याची किंमत 1 कोटी 25 रूपये आहे.
मुरगाव बंदरातील धक्क्यांवर ठेवलेले 24 कंटेनर या संचालनालयाच्या पथकाने जप्त करण्याची ही कारवाई कस्टम विभागाला विश्वासात घेऊन अगदी गुप्तपणे करण्यात आली. सदर 24 कंटेनर ठाणे मुंबईतील मे. आर्यन माईन्स ऍण्ड मिनरल्स या कंपनीचे असून त्यात नॅचरल गार्नेट हा माल आहे. या चोवीस कंटेनरमधील हा माल विदेशात निर्यात होण्यासाठी थांबला होता. मात्र, कायदय़ानुसार नॅचरल गार्नेट हा माल इंडियन रॅर अर्थस लिमिटेड यांच्यामार्फतच निर्यात करणे आवश्यक आहे. अन्य मालाची निर्यात करण्यात येत असल्याचे भासवून बेकायदेशीररीत्या नॅचरल गार्नेट निर्यात करण्याचा कंपनीचा प्रयत्न होता असा संशय आहे. निर्यातीसाठी थांबलेल्या या मालाची किंमत 1 कोटी 25 लाख एवढी आहे.









