मुंबई
जूनला संपलेल्या पहिल्या तिमाहीत वित्त क्षेत्रातील कंपनी मुथुट फायनान्सच्या निव्वळ नफ्यात 59 टक्के वाढ झाली असल्याचे समजते. नफा 841 कोटी रुपयांचा झाल्याचे सांगण्यात येते. कंपनीचा एकूण महसूल 28 टक्के वाढून 2 हजार 385 कोटी रुपये झाला आहे. वर्षाच्या मागे याच कालावधीत कंपनीने 530 कोटी रुपये निव्वळ नफा मिळवला होता. एकूण महसूलही 28 टक्के वाढून 2 हजार 385 कोटी रुपयांचा झाला आहे. जून 2019 ला संपलेल्या तिमाहीत हाच महसूल 1 हजार 857 कोटी रुपये होता.









