प्रतिनिधी / मुणगे :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुणगे येथील संपूर्ण परिसरामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने सोडिअम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली.
यामध्ये गावातील मुख्य रस्ता तसेच गावातील सर्व शाळा, विद्यालय, सर्व सरकारी कार्यालये, बँक, गावातील बारा वाड्यातील संपूर्ण परिसरात फवारणी करण्यात आली. तसेच गावात स्पीकर द्वारे जनजागृती देखील करण्यात आली.
गावातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गावाचे सरपंच,ग्रामसेवक, सदस्य, ग्रामस्थ यांनी पुढाकार घेऊन या उपक्रम राबविण्यात आला.









