प्रल्हाद हडफडकर, आपा गावकर यांचा सत्कार
प्रतिनिधी /पणजी
इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझातर्फे(आयएमबी) रंगभूमीदिन सवेश नाटय़गीत स्पर्धा व निवेदन आणि सादरीकरणातून नाटय़संगीताचा प्रवास उलगडणारा ’मुजरा संगीत रंगभूमीला’ या कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याहस्ते संगीत रंगभूमीवरील ज्येष्ट गायक- नट प्रल्हाद हडफडकर व आपा गावकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष दशरथ परब, सदस्य सचिव दिगंबर काणकोणकर, कार्यकारी सदस्या उज्वला तारकर उपस्थित होत्या.
मुजरा संगीत रंगभूमीला कार्यक्रमात
मुंबई येथील प्रसिद्ध गायकनट मुकुंद मराठे व ज्ञानेश पेंढारकर आणि गोव्यातील प्रसिद्ध गायिका प्रचला आमोणकर यांनी मराठी संगीत रंगभूमीवरील गाजलेल्या नाटय़पदांची
मेजवानी दिली. गोविंद भगत यांचे माहितीपूर्ण सुरेख निवेदन लाभले.दोन्ही गायकांनीही काही दुर्मिळ आठवणी सांगितल्या. सुभाष फातर्पेकर(संवादिनी),दत्तराज सुर्लकर(ऑर्गन),दत्तराज शेटय़? (तबला) यांनी साथसंगत केली.
अनुष्का थळीना प्रथम पारितोषिक
सवेश नाटय़गीतगायन स्पर्धेत अनुष्का थळी यांनी 5000 रुपयाचे प्रथम पारितोषिक पटकावले. तनिषा मावजेकर व राशी देसाई यांना द्वितीय पारितोषिक तर लक्ष्मी महात्म? यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. राजेश बोरकर, सुरज शेटगावकर, सीमा बर्वे, हर्षा गणपुले यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. प्रल्हाद हडफडकर व उज्वला तारकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.









