बेळगाव : मुचंडी (ता. बेळगाव) येथे अंदर-बाहर जुगार खेळणाऱया पाच जुगाऱयांना अटक करण्यात आली आहे. मारिहाळ पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्या जवळून 10 हजार 240 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
मुचंडी येथे सार्वजनिक ठिकाणी अंदर-बाहर जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बी. एस. मंटूर यांनी छापा टाकून पाच जणांना अटक केली. तसेच त्या पाच जणांवर कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.









