प्रतिनिधी / सातारा
वाई तालुक्यातील मुगाव येथे डबरी नावाच्या शेतातील गवत रोटा वेटरने काढत असताना आज सकाळी 8.45 वाजण्याच्या सुमारास मशीनमध्ये मान अडकून राजश्री अशोक रावडे (वय 49)यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे. त्यांच्या दुःखद घटनेमुळे मुगाववर शोककळा पसरली आहे.
याबाबत वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अशोक आनंदा रावडे रा.मुगाव ता. वाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक हे बाहेरगावी होते. त्यांना सकाळी 9 वाजता घराशेजारी राहणारे लक्ष्मण सोंडकर यांनी मोबाईल वर फोन करून सांगितले की चिखली येथील दिलीप रामचंद्र वाघ यांना त्यांचे गवत काढण्याचे रोट वेटर मशीन घेऊन घराशेजारील डबरी नावाच्या शिवारात गवत काढण्यासाठी बोलावले होते. शेतातील गवत काढत असताना सकाळी 8.45 वाजता रोटर मशीनमध्ये जास्त गवत अडकले.
रोटर चालक दिलीप वाघ यांनी रोटर मशीन थांबवली. राजश्री यांनी मशीन मधील गवत काढत असताना अचानक मशीन सुरू झाली त्यात राजश्री अडकल्या. त्यांना लगेच खाजगी वाहनाने वाई येथील गीतांजली हॉस्पिटलमध्ये आणले. परंतु तेथे डॉक्टर नसल्याने घोटावडेकर यांच्या हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. वाई पोलीस तपास करत आहेत.
Previous Articleजम्मू काश्मीर : 524 नवे कोरोना रुग्ण
Next Article सोलापूर : पाण्यात बुडून मायलेकीचा मृत्यू









