नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अलप्पन बंधोपाध्याय यांची केंद्र सरकारने बदली केली आहे. बंधोपाध्याय यांना सोमवारी दिल्लीत दाखल व्हायला सांगितले होते. परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपण मुख्य सचिव बंधोपाध्याय यांना पाठवणार नसल्याचे म्हटले आहे.
ममता बॅनर्जी यांनी या पत्रात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या या आदेशामुळे आपण हैरण आहे. कोरोनाच्या काळात बंधोपाद्याय यांना पाठवणार नाही तर ते त्यांच्या पदावर राहून कोरोना विरोधातील लढ्यात बंगालला मदत करत राहतील असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
पश्चिम बंगालचे सरकार मुख्य सचिवांना पदावरुन सोडू शकत नाही आणि सोडणार नाही. लागू कायद्याच्या अनुषंगाने कायदेशीर चर्चा केल्यानंतर मुदतवाढीचा पुर्वीचा आदेश लागू होता आणि तो मान्यही होता. असे ममतांनी पत्रात म्हटले आहे. तसेच आम्हाला खात्री आहे की, तुमच्या आदेशामुळे राज्यातील नागरिकांना कोणत्याही अडचणीत आणि अडथळा आणणार नाहीत.
Previous Articleसाखर कारखान्यांच्या शेअर्स रकमेत वाढ
Next Article डीईएसच्या रक्तदान शिबिरात 228 रक्त पिशव्यांचे संकलन









