मुंबई \ ऑनलाईन टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज ६१ वा वाढदिवस आहे. त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यानिमित्ताने मनसेचे अध्यक्ष आणि उद्धव ठाकरे यांचे बंधू राज ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या का? या प्रश्नावर भन्नाट उत्तर दिलं आहे. राज ठाकरे हे आज ठाणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा दिल्या का? असा सवाल करण्यात आला. त्यावर उत्तर देताना “मी त्यांना शुभेच्छा दिल्यात, तु काळजी नको करु, असं उत्तर राज ठाकरे यांनी दिलं. यावेळी त्यांनी ठाणे दौऱ्यामागील कारण सांगितलं. संघटनांच्या बांधणीसंदर्भात काही सूचना केल्या. १५-२० दिवसांनी मी पुन्हा एकदा येईन आणि त्यांच्याशी बोलेन, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
यावेळी राज ठाकरे यांनी पूरस्थितीवर भाष्य केलं. नियोजनशून्य कारभारामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत, असं राज ठाकरे म्हणाले. पूरग्रस्तांना प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने मदत करत आहे. मनसेच्यावतीने देखील त्या त्या भागात मदतकार्य सुरू आहे. मदतकार्य महत्वाचे आहे. नुसती पाहणी करून काहीही अर्थ नाही, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








