11 दिवसानंतर उपोषण मागे
प्रतिनिधी / म्हापसा
द्रिष्टी या कामगार महासंघटनेला सलग्न असलेल्या अखिल गोवा जीवरक्षक मरिन लाईनने प्रथम 28 दिवसांचे सांखळी उपोषण व नंतर 11 दिवस सलग आमरण उपोषण केलेल्या जीवरक्षकांनी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अखेर उपोषण मागे घेतले. अखेर म्हापसा गांधी चौकात अजित सिंग राणे, स्वाती केरकर, शेखर नाईक, सुदेश आर्लेकर, दिप्तेश नाईक, विजय भिके, किशोर राव, संजय बर्डे आदी विविध संघटनेच्या पदाधिकाऱयांनी लिंबुचे पाणी जीवरक्षकांना दिल्याने त्या जवानांनी आपले उपोषण मागे घेतले.
यावेळी बोलताना श्री. राणे म्हणाले की, आमचा प्रश्न सोडविण्यासाठी सत्याग्रह करण्यासाठी आमरण उपोषण केले. राज्य प्रशासनाने आमच्या विनंतीला मान देऊन आम्ही म्हापशात गांधी चौकात आलो याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलावून बैठक घेतली. 230 जणांची यादी आहे जे सुपूर्द केले. व हे सर्व जागा जानेवारीपर्यंत भरणार असल्याचे गोवा ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन मार्फत सरकारी सेवेत सामावून घेणार असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याने आम्ही हे उपोषण मागे घेतल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी आम्हाला कोणतेही लेखी आश्वासन दिले नाही मात्र यापूर्वी मरिन पोलीस, अन्य आदी प्रश्न सोडविले होते. 1300 कायमसेवा दिली होती तेव्हा डॉ. प्रमोद सावंत होते. मुख्यमंत्री आमच्यासाठी एक लकी मुख्यमंत्री बनले आहे असे ते म्हणाले. सर्व पक्षाच्या लोकांनी या जीवरक्षकांना पाठिंबा दिला असे ते म्हणाले.
जीवरक्षकांना न्याय देण्यासाठी आम्ही पुढे आलो- स्वाती केरकर
स्वाती केरकर म्हणाल्या की, आम्ही देवाला स्मरून म्हापशात आंदोलन केले. जोपर्यंत मुलांचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मुलांच्या मागे आम्ही सदैव राहिलो. जीवरक्षकांना नोकरी कशी मिळेल, त्यांची नोकरी मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही न्याय देण्यासाठी पुढे आलो आहे असे युनियन ट्रेडच्या स्वाती केरकर म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय बर्डे म्हणाले की, जीवरक्षकाचे आमरण उपोषण मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाने मागे घेतले असले तरी अपला मुख्यमत्र्यावर काडीचाही विश्वास नाही. मुख्यमंत्री जीवरक्षकांच्या भवितव्याशी खेळ करीत असल्याचा आरोप यावेळी संजय बर्डे यांनी केला.









