काजू उत्पादकांकडून मुख्यमंत्र्याचे आभार
वाळपई / प्रतिनिधी
कोरोना रोगाच्या वाढत्या धास्तीमुळे व सरकारने राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर काजू उत्पादकांची निर्माण झालेली गोची सरकारने दूर करण्याच्या दृष्टिकोनातून घेतल्यामुळे नागरिकांनी खरोखरच समाधानकारक आहे .गेल्या जवळपास पंधरा दिवसांपासून काजू उत्पादकांच्या घरांमध्ये काजूचा साठा होत असल्यामुळे व्यवसायीक विकत घेत नसल्याचे तक्रारी सरकारदरबारी करण्यात आल्यानंतर सरकारने गोवा बागायतदार संस्थेला या संदर्भातील निर्देश देताना काजू विकत घेण्याचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली असून आज काजूचा दर प्रति किलो 105 प्रमाणे आकारण्यात येत होता .शुक्रवारपासून पूर्ण क्षमतेने काजू विकत घेण्यात येईल अशा प्रकारची माहिती संस्थेच्या सूत्राकडून उपलब्ध झालेली आहे. मात्र काजू उत्पदकानी प्रकारची गर्दी करू नये व आरोग्य खात्याने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्ाs
पालन करावे अशा प्रकारचे आवाहन सूत्रांकडून करण्यात आलेले आहे .
त्याचप्रमाणे काजू कारखानदारांनी ही प्रति किलो 105 रुपयांप्रमाणे विकत घेण्यास प्रारंभ केल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. यासंदर्भात माहिती अशी की सध्या काजूचा मौसम सुरू आहे मात्र कोरोना रोगाच्या वाढता प्रादुर्भाव च्या पार्श्वभूमीवर सरकारने जीवनावश्यक वस्तू वितरित करण्यात येणाऱया आस्थापना व्यतिरिक्त इतर सर्व प्रकारचे आस्थापने बंद करण्याचा आदेश दिला होता .त्या प्रमाणे जीवनावश्य्ाक वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने बंद करण्यात आलेली आहे. मात्र काजू उत्पादन dयवसाय विकत घेत नसल्यामुळे काजू उत्पादकांची मोठय़ा प्रमाणात गोची निर्माण झालेली आहे. यासंदर्भात या वाढत्या तक्रारी गेल्या दहा दिवसांपासून सातत्याने करण्यात येत आहे व राज्याचे आरोग्य मंत्री तथा आमदार आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी व राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना यासंदर्भात गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती केली होती. त्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी येथील खास दखल घेत काजू उत्पादकांची कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही याची खबरदारी सरकार घेत असून त्यांनी गोवा बागायतदार संस्थेला यासंदर्भात चे विशेष निर्देश देताना काजू विकत घेण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झालेली आहे.
गोवा बागायतदार संस्थेच्या वाळपई येथील मार्केट यार्ड परिसरामध्ये आजपासून काजू विकत घेण्यास प्रारंभ झाला मात्र पूर्ण क्षमतेने काजू विकत घेण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. या यार्ड परिसरामध्ये प्रति किलो काजूचा दर 105 जाहीर करण्यात आला आहे. दररोज बाजारपेठेतील परिस्थितीनुसार काजूला दर प्राप्त होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. सध्यातरी प्रतिकिलो 105 प्रमाणे काजू विकास घेण्यात येत आहेत .बाजारपेठेची परिस्थिती बदलल्यास शुक्रवारपासून वेगळा दर आकारण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केलेले आहे. मात्र शुक्रवारपासून काजू उत्पादकांनी काजू विकण्यासाठी कोणत्या प्रकारची गर्दी न करता आरोग्य खात्याच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार वागावे अशा प्रकारचे आवाहन करण्यात आलेले आहे. सरकारने कोणत्याही ठिकाणी गर्दी करुन कोरोना रोगाचा वायरस पसरणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन केलेले आहे. सदर आवाहनाचे पालन करावे अशा प्रकारचे विनंती सूत्रांनी केली आहे. दरम्यान या संदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार सत्तरी तालुक्मयातील काही कारखानदारांनी विकत घेण्यात आजपासून प्रारंभ केलेला आहे. वाळपई शहरातील काही कारखानदारांच्या मालकांची संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आजपासून खऱया अर्थाने काजू विकत घेण्यास सुरुवात केलेली असून प्रति किलो काजू चादर 105 प्रमाणे करण्यात येत आहे .सरकारने काजू उत्पादकांना दिलेल्या या पाठिंब्यामुळे काजू उत्पादकानी गोवा राज्याच्या मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचे आभार व्यक्त केले असून काजू हा सत्तरी त्याप्रमाणे गोवा राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असल्यामुळे सरकारने या उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत उत्पादकांनी व्यक्त केलेले आहे.