बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. वाढती कोरोनाची संख्या प्रशासनाची चिंताही वाढवत आहे. राज्यात ६० वर्षाहून अधिक आणि ४५ वर्षे ते ६० वर्षापर्यंच्या व्यक्तींना लसीकरण करण्यात येत आहे. राज्यात लसीकरणासाठी नागरिकांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही. राज्यात झपाट्याने वाढणारी कोरोनाची संख्या पाहून आरोग्य मंत्र्यांनी लसीकरणाची संख्या वाढविण्याचे आदेश दिले आहेत. यातच राज्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनीही नागरिकांना लस देण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी कोरोना विरुद्धच्या या लढाईत लस हे आपल्यासाठी उपलब्ध असलेले सर्वात मोठे शस्त्र आहे. मी सर्व पात्र नागरिकांना लसी देण्यास उद्युक्त करतो आणि आपल्या सभोवतालच्या नागरिकांनी सी देण्यास प्रोत्साहित करतो. तसेच मुख्यमंत्र्यांनी मास्क वापरून आणि सामाजिक अंतर राखून सुरक्षित राहू असे म्हंटले आहे.









