वाळपई / प्रतिनिधी
सध्या कोरोना रोगाच्या महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढणारी रुग्णांची संख्या यामुळे गोवा सरकारने राज्यांमध्ये सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. कर्नाटक व महाराष्ट्र भागातून गोव्यामध्ये येणाऱया सीमा सीलबंद करण्यात आल्यानंतर त्या संदर्भात आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातून राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी रात्री येथील तपासणी केंद्रावर भेट देऊन यासंदर्भात संपूर्णपणे आढावा घेण्याचा प्रयत्न केला .
सदर ठिकाणी उपस्थित असलेल्या कर्मचाऱयांना कडक तपासणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री दिले असून कोणत्याही प्रकारचे संशयित वाहन व नागरिक परराज्यातून गोव्यामध्ये प्रवेश करणार नाही याची विशेष दखल घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
याबाबतची माहिती अशी की, देशामध्ये मोठय़ा प्रमाणात कोरोना रोगाचा विषाणू झपाटय़ाने फैलावताना दिसत आहे. गोव्यात या रोगावर पूर्णपणे नियंत्रण आले असले तरी गोव्याच्या शेजारी असलेल्या कर्नाटक व महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात विषाणूंचा फैलाव होत असल्याचे समोर आलेले आहे. गेल्या आठ दिवसांपासून या दोन्ही राज्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत असून याची गंभीर दखल गोव्याच्या सरकारने घेतलेली आहे .परराज्यातून येणारी कोणत्या प्रकारची वाहने कडक तपासणीविना दिला जाऊ नये अशा प्रकारचा आदेश देण्यात आलेला असून या संदर्भात आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातून गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गुरुवारी रात्री केरी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन या संदर्भात आढावा घेण्याचा प्रयत्न केला. सदर भेटीत त्यांनी तपासणी केंद्रावर तैनात असलेले पोलीस आरोग्य खात्याचे कर्मचारी अबकारी खात्याचे कर्मचारी यांना विशेष सूचना करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक भागांमध्ये रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहेत यामुळे याचा प्रादुर्भाव गोव्यामध्ये पसरू नये व गोव्याची परिस्थिती चिंताजनक होणार नाही यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे .त्याचप्रमाणे त्यांनी गेल्या आठ दिवसापासून कर्नाटक भागातून भाजी जीवनावश्यक वस्तू घेऊन येणाऱया वाहनांच्या संख्येत संदर्भात सविस्तरपणे माहिती घेतली. परवाना नसताना व कडकपणे तपासणी करूनच जीवनावश्यक वस्तु घेऊन येणाऱया वाहनांना प्रवेश द्यावा व या संदर्भात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही याची विशेष दखल घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे. दरम्यान अचानकपणे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केरी तपासणी केंद्रावर भेट देण्यात आल्यानंतर तेथील कर्मचाऱयांची धावपळ झाली .गेल्या जवळपास वीस दिवसांपासून तपासणी केंद्रावर सातत्याने पोलीस कर्मचारी डोळय़ात तेल घालून तपास करीत असून संशयास्पद वाहनांना कोणत्याही प्रकारे गोव्यामध्ये प्रवेश देत नसल्याचे कर्मचाऱयांनी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना सांगितले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पोलिस कर्मचाऱयांचे तोंडभरून कौतुक केले व गोव्याच्या हितार्थ चांगल्या प्रकारची सेवा देण्यासाठी सर्वांनी सरकारला सहकार्य करावे अशा प्रकारचे आवाहन केले आहे.









