ऑनलाईन टीम
राज्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दररोज मोठ्या प्रमाणात वाढ होत असून मृतांचा टक्काही वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या रविवारपासून राज्यात रात्रीची जमावबंदी घोषित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज याबाबत घोषणा केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता, जिल्हा तसेच राज्य टास्क फोर्सचे सदस्य यांच्याशी संवाद साधून कोरोना स्थिती आणि त्यावर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती घेतली.
वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी, कडक उपाययोनजा लागू करण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नाईलाजाने संपूर्ण राज्यात रात्रीची जमावबंदी लागू करणे गरजेचे आहे. त्यासाठी रविवार दि. २८ मार्च रोजी रात्रीपासून राज्यात जमावबंदी लागू करण्याच्या सूचना ठाकरे यांनी दिल्या. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असेही ठाकरे म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









