मुंबई \ ऑनलाईन टीम
कोकणाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी काय दिलं? मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत पॅकेज का जाहीर केलं नाही? असा सवाल करत नारायण राणे यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा म्हणजे नुसता फेरफटका आणि ‘नौटंकी दौरा असल्यांच नारायण राणे यांनी म्हटलंय. सध्याचं सरकार हे महाराष्ट्राचं शोषण करणारं सरकार असून त्यांच्या सगळ्या खात्यांमधला भ्रष्टाचार आपण पुराव्यानिशी उघड कऱणार असल्याचा खुलासाही नारायण राणे यांनी केला आहे.
यावेळी नारायण राणे म्हणाले की, केवळ तीन तासाच्या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. पण या वादळात किती लोकांचं नुकसान झालं, किती जणांचे रोजगार गेले याची माहिती लोकांकडून घेतली नाही. मुख्यमंत्र्यानी लोकांची का भेट घेतली नाही? तसेच मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत पॅकेज का जाहीर केलं नाही, असा सवाल करत त्यांच्या आश्वासनामध्ये स्पष्टता नाही अशी देखील केली.
राज्याच्या प्रत्येक खात्यात भ्रष्टाचार चालला असून तो आपण उघड करणार असल्याचं खुलासा नारायण राणे यावेळी केला. कोरोनाच्या औषधांच्या टेंडरमध्ये पसे खाल्ले जात आहेत. संजय राऊतांनी हे जाहीर करावं अन्यथा मी जाहीर करणार. पोलीस वसाहतीच्या टेंडरमध्येही भ्रष्टाचार झाला असून प्रत्येक खात्यातील भ्रष्टाचार नावानिशी उघड करणार असल्याचे नारायण राणे यावेळी म्हणाले.
सरकारनं लोकांना वाचवण्यासाठी आत्तापर्यंत काहीही केलं नाही…ना लसी आहेत, ना व्हेंटिलेटर्स आहेत..काहीच नाही, अशा शब्दात त्यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. जनाची नाही तर मनाचीही नसलेलं हे सरकार असल्याचे नारायण राणे यावेळी म्हणाले..
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








