प्रतिनिधी /पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील लोकांना गुढीपाडवा म्हणजे संसार पाडव्याच्या तसेच नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुढीपाडवा हा सण हिंदू दिनदर्शिकेनुसार नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. हा सण आनंदाचे आणि समृध्दीचे प्रतिक मानले जाते. गुढीपाडव्याच्या शुभप्रसंगी आपल्या स्वप्नांची, आशांची आणि आनंदाची एक नवीन सुरुवात होवो. हे वर्ष आपल्या सर्वांसाठी यश आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.









