सांगली \ ऑनलाईन टीम
भाजप आमदार गोपीचंद पडळकर नेहमीच त्यांच्या वक्तव्यासाठी चर्चेत असतात. आज देखील त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पंढरपूर दौऱ्यावरून त्यांचावर टीका करत एक वक्तव्य केले आहे ज्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही, अशा शब्दात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या पंढरपूर दौऱ्यावर टीकास्त्र सोडलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भर पावसात स्वत: गाडी चालवत आषाढीच्या महापूजेसाठी पंढरपूरला गेले होते.
गोपीचंद पडळकर म्हणाले, मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही. पण यांना खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दरबारातही सुटत नाही. याच ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा महापालिका कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतत आहे. जे आपल्या जीवाची पर्वा न करता पालिका कर्मचारी म्हणजे ‘कोविड वॅारीयर’ यांच्या सुरक्षा हमी अधिकारचं वाटोळं करायला हे ठाकरे सरकार निघालंय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी 19 तारखेला दुपारी पंढरपूरला रवाना झाले. रात्री 9 च्या सुमारास ते पंढरपुरात दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह मुंबईतील मातोश्री निवासस्थानावरुन दुपारी अडीचच्या सुमारास पंढरपूरकडे रवाना झाले होते. यावेळी ते स्वत: ड्रायव्हिंग करत होते.
Previous Articleकोल्हापूर : निर्बंधात साजरी होणार आज बकरी ईद
Next Article ‘बर्ड फ्लू’मुळे देशात पहिला मृत्यू








