वाळपई प्रतिनिधी
गोळवली या ठिकाणी चार वाघांच्या मृत्यू यापूर्वी ज्या बांधवांची गुरे मारण्यात आलेली आहे. त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत प्रदान करण्यात आली.वन खात्याचे मुख्य वनपाल कुलदीप शर्मा यांनी आज संध्याकाळी गोळावली धनगरवाडा याठिकाणी पावणे कुटुंबीयांकडे मुख्यमंत्री सहायता निधीचा 15 हजारांचा धनादेश ठाणे पंचायतीच्या सरपंच प्रजिता गवस पंचायत सभासद वैशाली देसाई यांच्या उपस्थितीत प्रदान केला.
पावणे यांची गाय 20 डिसेंबर रोजी वाघाच्या शिकारी मध्ये मरण पावली होती. त्यानंतर मालो पावणे यांची म्हैस 30 डिसेंबर रोजी मारण्यात आली होती. विठो पावणे यांनी यासंदर्भात नुकसान भरपाई देण्याची मागणी वनखात्याकडे केली होती. यासंदर्भात ताबडतोब कारवाई करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून पंधरा हजाराचा धनादेश याकुटुंबाला आज संध्याकाळी प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे सत्तरी तालुक्मयातील देरोडे याठिकाणी लाडको जाधव यांची गाय वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली होती. त्यांनाही मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पंधरा हजारांचा धनादेश संध्याकाळी ठाणे या ठिकाणी प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना कुलदीप शर्मा यांनी मालो पावणे या कुटुंबीयांना म्हैस मृत्यू यासंदर्भाचा अर्ज सादर करण्याची विनंती केली आहे. त्यानंतर लगेचच त्यांना आर्थिक स्वरूपाची मदत प्रदान करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे वन खात्याच्या माध्यमातून आवश्यक स्वरूपाची कागदपत्रे पूर्ण करण्यात आल्यानंतर याच खात्याच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यासाठी शक्मय तेवढय़ा लवकर प्रयत्न करण्यात येतील अशा प्रकारचे आश्वासन दिले आहे.









