बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आज लसीचा पहिला डोस घेतला. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी बेंगळूरच्या व्हिक्टोरिया रुग्णालयात कोव्हीड -१९ लसीचा पहिला डोस मिळाला. करोना लसीसंदर्भातील संभ्रम दूर व्हावा या हेतूने मुख्यमंत्र्यांनी लस घेतली. सर्वांनीच लसीकरणाच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं असा संदेश देण्यासाठी राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी लस घेतली आहे.
करोना लसीकरणासंदर्भातील संभ्रम दूर व्हावा आणि जास्तीत जास्त लोकांनी या लसीकरणामध्ये सहभागी व्हावे यासाठी राजकीय नेत्यांसह अन्य नेत्यांनी लसीकरण करून घेण्यास सुरुवात केली आहे.









